उज्ज्वल निकम यांनी प्रचाराचा नारळ फोडला

मुंबई

उत्तर मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी आज त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुंबादेवीचे दर्शन घेऊन निकम यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यांनंतर त्यांनी चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन केले. यावेळी निकम यांच्यासोबत भाजपाचे पराग आळवणी उपस्थित होते. निकम यांनी सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांना अभिवादन करून मी माझ्या प्रचाराची सुरुवात करत आहे. पूनम महाजन यांना पक्ष कदाचित नवी जबाबदारी देईल. याबाबत मी आताच काही सांगू शकत नाही. मला मतदान का करावे, हे मी जनतेला प्रचारादरम्यान सांगणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top