उज्ज्वल निकम यांनी राज ठाकरेंची भेट घेतली

मुंबई- उत्तर मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या मुंबईतील निवसस्थान शिवतीर्थावर ही भेट झाली. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारदेखील उपस्थित होते. यावेळी या नेत्यांनध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. उज्वल निकम यांच्या प्रचारासंदर्भात ही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ते अनेक नेत्यांना भेटत आहेत. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top