उडत्या कारचे प्रथमच प्रवासी उड्डाण

ब्रातिस्लाव्हा
स्लोव्हाकियामध्ये उडत्या कारने आपले पहिले प्रवासी उड्डाण केले. या कारमध्ये फ्रेंच संगीतकार जीन मिशेल जैरे यांनी क्लीन व्हिजनचे अध्यक्ष स्टीफन क्लेन यांच्यासोबत या फ्लाईंग कारमध्ये बसून उड्डाणाचा आनंद लुटला. त्यांनी २५०० फूट उंचीवर उड्डाण केले. ही कार दोन आसनी आहे. स्लोव्हाकियाच्या परिवहन प्राधिकरणाने या कारला उड्डाण करण्याचे प्रमाणपत्र दिले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कारने आतापर्यंत ५०० हून अधिक वेळा टेकऑफ आणि लँडिंग केले आहे. या कारचा सर्वाधिक वेग ताशी १८९ किलोमीटर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top