उड्डाणपुलासाठी मालेगाव बसस्थानकाच्या स्थलांतरास व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

मालेगाव- शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी नवीन बसस्थानकाचे जुन्या बसस्थानकात स्थलांतर करण्यास आता व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. अन्य उपाय करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी या व्यापाऱ्यांनी पालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्याकडे केली आहे. आयुक्तांनी याबाबत सामोपचाराने निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

शहरातील जुना आग्रा रोडवर उड्डाणपुलाचे काम मागील आठ वर्षांपासून सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्त गोसावी यांनी अधिकाऱ्यांसह उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी या उड्डाणपुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले होते. मात्र या भागात नवीन बसस्थानक असल्याने जुना आग्रा रोडवरून बसेसची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.त्यामुळे उड्डाणपुल कामाला अडचण होत आहे. म्हणूनच हे बसस्थानक जुन्या बसस्थानकात हलविण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे. मात्र त्याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top