उत्तराखंडच्या जंगलातील वणव्यात दीडशे हेक्टर जंगल जळून खाक

देहरादून –
उत्तराखंडच्या जंगलांमध्ये अनेक दिवसांपासून वणवे पसरत असून या मोसमात आतापर्यंत वणव्याच्या १११ घटना घडल्या आहेत. या वणव्यात आतापर्यंत १६७ हेक्टरहून अधिक जंगल जळून खाक झाले आहे.

उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी लागलेला वणवा अजून विझलेला नाही. तो पसरत चालला असून त्यामुळे जंगलातील वन्यजीव जीव वाचवण्यासाठी नागरी वस्तीत शिरत असल्याच्या घटनाही घडत आहेत. या जिल्ह्यात वणव्याच्या ७४ घटना घडल्या असून आरक्षित वनातही वणवे लागत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यात होम गार्डसचाही समावेश आहे. लोकांनाही आपल्या आजुबाजूच्या जंगलात आगीच्या घटना घडल्या तर त्या विझवायला सांगितल्या असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी आशुतोष सिंह यांनी दिली आहे. प्रशासनाने पुढील आदेश मिळेपर्यंत घराच्या जवळ कचरा जाळण्यासही प्रतिबंध केला आहे.

काल रात्री टकाडीच्या जंगलात लागलेला वणवा वेगाने पसरली असून ती महाकाल जंगलापर्यंत पोहोचली आहे. वन विभागाच्या अग्निशमन दलाने मोठ्या मुश्किलीने या आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आहे. अस्कोट क्षेत्रातील खोलिया गावातली आग नागरिकांच्या घरापर्यंत आली आहे. या आगीत नागरिकांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जंगलातील आगीमुळे जवळच्या घरांच्या छतावर राखच राख पसरली आहे. उत्तराखंड मध्ये अनेक दुर्गम जंगले असून त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी पोहोचणेही मुश्किल झाले आहे. उत्तराखंडमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात वणवे लागण्याच्या घटना घडत असतात.त्र प्रकृती गंभीर असल्याने कार्डिओ रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशांत यांना तपासून मृत घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top