उत्तराखंडच्या मसुरीमध्येअपघात! ५ जणांचा मृत्यू

डेहराडून

उत्तराखंडमधील मसुरी-डेहराडून मार्गावरील झारी पाणीजवळ कार डोंगरावरून खाली कोसळली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १ तरुणी गंभीर जखमी झाली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चुनाखल-झारीपाणी रस्त्यावरील कमल कॉटेजजवळ आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

डेहराडूनमधील एका शैक्षणिक संस्थेचे ६ विद्यार्थी कारने प्रवास करत होते. चुनाखलजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार वरच्या लेनमधून डोंगरातून खाली रस्त्यावर पडली. कारमध्ये चार विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी होत्या. त्यापैकी ५ जणांनी आपले प्राण गमावले. तर एका जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top