उत्तर कोरियाने बनविले विषारी पेन ?

प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंग ऊन युध्दखोरीसाठी कुप्रसिध्द आहे. किम जोंग ऊन बऱ्याच वर्षांपासून जैविक अस्त्र (बायॉलॉजिकल वेपन्स) बनविण्यच्या प्रयत्नात आहे. उत्तर कोरियाने असे विषारी पेन तयार केले आहे की ज्या पेनमुळे साथीचे आजार पसरू शकतील,असा गंभीर इशारा अमेरिकेने दिला आहे.
ब्रिटनमधील द टाईम्समध्ये या संदर्भात एक वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. या वृत्तामध्ये उत्तर कोरियाच्या आण्विक शस्त्रास्त्रांपेक्षा जैविक शस्त्रास्त्र निर्मितीबद्दल गंभीर चिता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने तयार केलेली विषारी पेन अॅन्थ्रॅक्स आणि कांजण्या यांसारखे साथीचे आजार पसरवून जगात मोठा उत्पात घडवू शकतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top