Home / News / उत्तर प्रदेशातील ८ रेल्वेस्थानकांच्या नावात बदल

उत्तर प्रदेशातील ८ रेल्वेस्थानकांच्या नावात बदल

लखनऊ-भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशातील ८ रेल्वे स्थानकांच्या नावात बदल केला आहे. मोगल शासकांची ही नावे बदलण्यात आली असून या स्थानकांना...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

लखनऊ-भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशातील ८ रेल्वे स्थानकांच्या नावात बदल केला आहे. मोगल शासकांची ही नावे बदलण्यात आली असून या स्थानकांना संतांची व स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्यात आली आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वझीरगंज स्थानकाचे नाव अमर शाहीद भाले सुलतान असे करण्यात आले असून फुरसतगंज स्थानकाचे नाव बदलून ते तापेश्वरनाथ धाम असे करण्यात आले आहे. याबरोबरच काशिमपूरचे नाव जैस सिटी, अकबरगंजचे मा अहोरवा भवानी धाम, मिसरौलीचे मा कालिकान धाम, बनीचे स्वामी परमहंस आणि निहालगढचे नाव महाराजा बिजली पासी असे करण्यात आले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या