Home / News / उत्तर प्रदेशात अलीगढमध्ये भीषण अपघात! ५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात अलीगढमध्ये भीषण अपघात! ५ जणांचा मृत्यू

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेस वेवर काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेस वेवर काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. प्रतापगडच्या कृष्णा ट्रॅव्हल्सची डबल डेकर बस दिल्लीहून आझमगड आणि मऊकडे जात होती. यावेळी, यमुना एक्सप्रेस वेवर ५६ क्रमांकाच्या पॉईंटवर येताच बसची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी पोहचून बचावकार्य केले. या अपघातात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जेवार येथील कैलास रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये पाच महिन्याचे बाळ, एक महिला आणि तीन पुरुष यांचा समावेश आहे.

Web Title:
संबंधित बातम्या