उद्धव ठाकरेंचीच वृत्ती औरंगजेबासारखी चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

मुंबई- मोदी नाही, औरंगजेब म्हणा. औरंगजेब याचा जन्म हा नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झाला आहे. त्यामुळे दोघांचीही विचारसरणी सारखी असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. या वक्तव्यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार समाचार घेतला. सत्तेसाठी उद्धव ठाकरे पिसाळलेले असून त्यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी असल्याची जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढले. सख्ख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे. उद्धव ठाकरे 22 जानेवारीची तारीख विसरले का? राममंदिरांचे आमंत्रण असूनही काग्रेसच्या दबाबाखाली राममंदिरांच्या सोहळ्याला गेले नाही. पण 4 जून ( निवडणुकीचा निकाल ) येऊ द्या, मग तुम्हाला दिसेल. 2024 ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top