उद्धव ठाकरेंची १७ वर्षांनंतर प्रथमच पोलादपुरात जाहीर सभा

रायगड – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यात दोन दिवसांत सहा ठिकाणी झंझावाती जाहीर सभा घेणार आहेत. त्यामध्ये शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी पोलादपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तब्बल १७ वर्षांनंतरची पोलादपूर मधील उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे.

पोलादपूर शहरातील भैरवनाथनगर येथील देवीची सहान येथे सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे.या पहिल्याच सभेमुळे शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.शहरातील मुंबई-गोवा मार्गाच्या पूर्वेकडील सर्व्हिस रोडवरून भैरवनाथ नगरच्या दिशेने ७५ मीटर अंतरावर या सभेसाठी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.दोन ते अडीच हजार आसन क्षमतेचा हा मंडप असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top