उद्या वसई शहरात निघणार ख्रिसमस कार्निव्हल मिरवणूक

वसई- ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवार २५ डिसेंबर रोजी गोव्याच्या धर्तीवर भव्य अशी ‘वसई ख्रिसमस कार्निव्हल मिरवणूक ‘ निघणार आहे.
या मिरवणुकीची सुरुवात उद्या सोमवारी दुपारी मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणार्‍या वसईतील रमेदीतील घोगळेवाडी येथून होणार आहे.यावेळी विजय पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील,घोगळेवाडी मंडळाचे अध्यक्ष नेव्हील डिसोझा,कोमसाप पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे,कार्निव्हल मिरवणुकीचे प्रणेते सुनील डिमेलो,कॅथॉलिक बँकेचे माजी उपाध्यक्ष गेगरी डिमेलो आणि कार्निव्हल मिरवणूक समितीचे प्रमुख रॅडोल डिमेलो आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही मिरवणूक रमेदी येथून पुढे होळी मार्गे आवटन,बंगली, पापडी नाका,ताम तलाव,
पार नाकामार्गे घोगळे गावात सायंकाळी सात वाजता पोहोचेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top