छत्रपती संभाजीनगर – हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आजचा दौरा रद्द करण्यात आला. गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन यासोबतच जिल्ह्यात विकास कामांचा उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. याचवेळी त्यांच्या या दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. या विरोधामुळे हा दौरा रद्द करण्यात आला, अशी देखील चर्चा सुरु आहे.
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमास अजित पवारांसह सर्वच राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. याबाबत गंगापूर तहसीलदार यांना मराठा आंदोलकांनी निवेदन देखील दिले होते. या निवेदनात म्हटले होते की, “शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करणार आहोत. तरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा. अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील याची नोंद घ्यावी. असे असतांना आता अजित पवारांनी आपला दौरा रद्द केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2023/12/images.jpg)