उबाठाच्या गीतावर आक्षेप घेतल्यावर ‘आप’ प्रचारगीतावर आयोगाचा आक्षेप

नवी दिल्ली – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारगीताला आक्षेप घेतल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी आम आदमी पक्षा(आप)च्या प्रचारगीतावर पडली आहे. आपच्या प्रचारगीतामुळे केंद्र सरकार व तपास यंत्रणांची छबी मलिन होत असल्याचे कारण देऊन निवडणूक आयोगाने हे गीत वापरण्यास मनाई केल्याचा आरोप आज आपने केला. यावरून गदारोळ झाल्यावर आपण आपला केवळ गाण्यात बदल करायला सांगितला आहे, असा खुलासा केला. मात्र, भाजपा आपल्याला हवा तसा प्रचार उघडपणे करत असताना सरकारला निवडणूक आयोगाला पुढे करून केवळ विरोधी पक्षांना प्रचारही करू द्यायचा नाही का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.
आपने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेले दोन मिनिटांचे प्रचारगीत आपचे आमदार दिलीप पांडे यांनी लिहिले आहे. रॅप प्रकारच्या या गीतातून केजरीवाल, सिसोदिया तसेच अन्य ‘आप’ नेत्यांच्या अटकेला विरोध केला आहे. ‘जेल के जवाब में हम वोट देंगे’ असा या गाण्याचा मुखडा आहे. या गाण्याच्या व्हिडिओत ‘आप’ नेत्यांच्या अटकेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने नोटीस पाठवून या गाण्याला मनाई केल्याचा दावा आपने केला आहे. या गाण्यात केजरीवाल यांच्या तुरुंगातील फोटोसह जेल के जवाब में हम वोट देंगे’ अशी लिहिलेली पोस्टर्स हाती घेतलेला आक्रमक जमाव दाखवला असून, त्यातून न्यायव्यवस्थेवर आक्षेप दिसतो. तसेच यात अनेक वेळा वापरलेल्या ‘जेल के जवाब में हम वोट देंगे’ या शब्दांतून हे केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 अंतर्गत निर्धारित कार्यक्रम आणि जाहिरात कोडच्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियम 6(1(जी) च्या तरतुदींचे उल्लंघन होत आहे. पोलीस आणि निदर्शकांमधील झटापटीसह ‘तानाशाही पार्टी को हम चोट देंगे, हे शब्द हिंसाचाराचे समर्थन करतात. तसेच पोलिसांच्या गराड्यातील मनिष सिसोदिया यांच्या दृश्यासह ‘गुंडा गर्दी के खिलाफ वोट देंगे’ हे शब्द पोलिसांची वाईट छबी दाखवतात. या शब्दामुळे पोलिसांच्या कामावर आक्षेपार्ह आणि बदनामकारक टिपणी व्यक्त होते. शहानिशा न केलेल्या सत्यांशावर आधारित अनेक शब्दही गीतात आहेत, असे आयोगाच्या नोटिशीत म्हटले आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपच्या नेत्या अतिशी म्हणाल्या की, इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने एखाद्या पक्षाच्या प्रचारगीतावर बंदी घातल्याचा प्रकार घडला. या प्रचारगीतात कुठेही भाजपाचा उल्लेख नाही. त्याचबरोबर या गीतातून कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही. भाजपाकडून झालेल्या आदर्श आचारसंहिता भंगांच्या प्रकरणात निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. ही भाजपाची हुकूमशाही आहे. या विरोधात कोणी बोलले तर ते चुकीचे ठरते. लोकशाही धोक्यात आली असल्याचे यातून दिसून येते. आयोगाने भाजपाच्या आचारसंहिता भंगावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांवरची कारवाई थांबवावी असे आवाहनही केले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारगीतातील ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ शब्द बदलायला सांगितले होते. उबाठाने ते हे शब्द बदलणार नाही, अशी भूमिका घेऊन निवडणूक आयोगाकडे फेरविचार याचिका केली होती. परंतु निवडणूक तीही फेटाळून ठाकरे गटाला धक्का दिला होता. त्यावेळी ठाकरे गटानेही भाजप उठताबसता रामाचे नाव घेत असताना शिवसेनेला ‘जय भवानी’ वापरायला बंदी करत आहे, असा आरोप केला होता.

यात काय आक्षेपार्ह?
जेल के खिलाफ हम वोट देंगे
तानाशाही पार्टी को हम चोट देंगे
गुंडागर्दी के खिलाफ
केजरीवाल को वोट देंगे
हम झाडू को वोट देंगे
आवास के खिलाफ थी
बस उनको इन्होने जेल
में डाल दिया
बस उनको ही बाहर रखा
जिन्होंने इनको माल दिया
इतना लालच इतनी नफरत
भ्रष्टाचारी से मोहब्बत
ऐसे किरदारों को सत्ता मे आनेसे
रोक देंगे हम वोट देंगे
तेल बेचा रेल बेचा
एलआयसी और सेल बेचा
जनता को फकीर रखा
बँक बेचा खेल बेचा
इन्टरन्स एक्झाम स्कॅम हुआ
पास बेचा फेल बेचा
नौकरियों पर महगाई पर
चुप्पी रखने वालों को हम चोट देंगे
जेल के जवाब में हम वोट देंगे
देश को चलाने के लिए ही संविधान है
भाईचारा ना हो तो कैसा हिंदुस्थान है
गुंडो वाली पार्टी को छोडो
उनको चुनो जो तूमको अब
अच्छी शिक्षा बिजली पानी
अच्छी सेहत जॉब अच्छे रोड देंगे
गुंडो वाली पार्टी को हम चोट देंगे
आम आदमी पार्टी को वोट देंगे
जेल के जवाब में हम केजरीवाल
को वोट देंगे झाडू को हम वोट देंगे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top