उबाठाच्या बडगुजरांचा अटकपूर्व जामीन मंजूर

नाशिक – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नगरसेवकपदाचा गैरवापर करून स्वत:च्या कंपनीला महापालिकेच्या माध्यमातून शासकीय कंत्राट मिळवून देत महापालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बडगुजर यांच्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूक व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जाप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top