उरणमध्ये ‘पोपटी’ हंगाम सुरूवाल, चवळीचे पीक बहरले

उरण- सध्या हवेत गारवा वाढल्याने खव्वयांना ‘पोपटी पार्टी’ची चाहूल लागली आहे. उरणच्या पूर्व भागातील चिरनेर,कळंबुसरे,कोप्रोली आदी भागांत पोपटीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी लागणारे वाल चवळी आणि मुगाचे पीक नुकतेच बहरू लागले आहे.
वाल,चवळी आणि मुगाच्या शेंगा तयार झाल्यानंतर पोपटी पार्ट्या सुरू होतात. पण सध्या हवेत गारठा पडल्याने अनेकांना पोपटीचे वेध लागले आहेत. पोपटीसाठी भाज्या,मडके किंवा पत्र्याचा डबा, लाकडे, भांबुड्यांचा पाला,वाटण आदी सामान लागते. पोपटीसाठी शाकाहरी असेल त्यांना भाज्या व मांसाहारी असतील त्यांना अंडी, मटण किंवा चिकनही आणले जाते.बया मोसमात ओसाड जागी व शेताच्या बांधावर उगवलेल्या भांबुर्डा वनस्पतीचा वापर केला जातो. मोकळ्या जागी पोपटीचे मडके बसवण्यासाठी एक वितएवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडके उलटे ठेवले जाते. मडक्याभोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या लावून त्याला आग पेटवली जाते. अर्धा ते पाऊण तासाने पोपटी करणारे जाणकार मडक्यावर थोडे पाणी शिंपडतात. ‘चर्र’ असा आवाज आला की पोपटी शिजल्याचे समजते. नंतर एका पेपरवर हे मडके ठेवून त्यातील वरचा भांबुर्ड्यांचा पाला काढला जातो. मडक्यातील खमंग भाज्या बाहेर काढण्यासाठी सगळेजण त्यावर तुटून पडतात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top