Home / News / एअर इंडिया विमानाततुटलेली खुर्ची होती क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सची तक्रार

एअर इंडिया विमानाततुटलेली खुर्ची होती क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सची तक्रार

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या प्रवासादरम्यान आलेल्या वाईट अनुभवाबद्दल दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोह्डसने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये नाराजी व्यक्त...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या प्रवासादरम्यान आलेल्या वाईट अनुभवाबद्दल दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोह्डसने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.जॉन्टी सध्या भारतात असून त्याने म्हटले आहे की, माझे विमानप्रवासाच्या वाईट अनुभवाचे सत्र अद्यापही सुरु आहे. एअर इंडियाचे मुंबई ते दिल्ली विमान दीड तास उशिरा निघाले. त्यानंतर मी विमानात माझ्या जागेवर आलो तेव्हा लक्षात आले की माझी सीट तुटलेली होती. आता पुन्हा एअर इंडियाने दिल्ली ते मुंबई प्रवास करण्यापेक्षा इथोपियन एअरलाइन्साच्या विमानाने परत केपटाऊनला जाणे सहज होईल. जॉन्टीच्या या पोस्टवर एअर इंडियाने लागलीच माफी मागितली असून या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन त्याला दिले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या