एआय गर्लफ्रेंडमुळे पुरुषांच्या एकटेपणात आणखी वाढ

कॅलिफोर्निया –

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) गर्लफ्रेंडच्या वाढीमुळे पुरुषांचा एकटेपणा आणखी जास्त वाढत आहे. पुरुषांची पिढी नष्ट होण्याचा धोका आहे, असे लिबर्टी विटर्ट या प्राध्यापिकेचे म्हणणे आहे. विटर्ट या ऑलिन व्यवसाय विद्यालयातील डेटा सायन्स या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या आपल्या वर्गातील मुख्यतः १८ वर्षांच्या विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीलाच ते कोणते सोशल मीडिया ॲप वापरतात हे विचारतात.

या पद्धतीमुळे तरुणांमध्ये काय लोकप्रिय आहे हे समजते. यावेळी त्यांच्या विद्यार्थ्याने त्यांना एआय गर्लफ्रेंडबद्दल सांगितले. कोरोना महामारीपासून एआय व्हर्च्युअल पार्टनर वाढत आहेत, असा निष्कर्ष त्यांनी काडला आहे. रेप्लिका हे लोकप्रिय ॲप एआयवर चालते. ते डिजिटल साथीदार पुरवते. कोरोना काळात ३८ टक्के वाढ झाल्यानंतर २०११ मध्ये या ॲपला १० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते मिळाले आहेत. मागील काही वर्षात, अनेक रेप्लिका वापरकर्त्यांनी प्रेमात असल्याची, नातेसंबंधात गुंतलेली किंवा त्यांच्या एआय साथीदाराशी लग्न केल्याचे सांगितले आहे. त्यावरून एआय गर्लफ्रेंडमुळे पुरुषांच्या एकटेपणात वाढ होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top