“एकदा ठरले की ठरले” वसंत मोरे यांचा स्टेटस

पुणे- मनसेतून बाहेर पडलेल्या वसंत मोरे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु गुरुवारी रात्री काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर करत पुण्यातून कसबा पेठेचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली. त्यानंतर त्यांनी “एकदा ठरले की ठरले” असे कॅप्शन देत स्वत:चा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला. त्यांच्या या भूमिकेकडे पुणे लोकसभा मतदारंसघात आता चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
त्यासोबत वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, “मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते. अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजपा नेते बोलले की निवडणूक एकतर्फी करू. पण पुणेकर कधीच कोणाला एकर्फी निवडून देत नाहीत. “
मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून विविध नेते मंडळींच्या भेटीगाठी घेत त्यांनी चाचपणी सुरू केली. वसंत मोरे यांनी शरद पवार, संजय राऊत आदी नेत्यांची भेट घेऊन पुण्यातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ही जागा काँग्रेसच लढवणार असल्याचे आणि मोरे यांना काँग्रेसकडून संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोरे यांनी एकला चालो रे ची भूमिका घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top