एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

अहमदनगर
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटाजवळ एका ओढ्यात गाडी उलटल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल रात्री ११ वाजता घडली. या अपघातात एक मुलगी बचावली. मृतांमध्ये एका मुलीसह ३ महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व जण एकाच कुटुंबातील असून ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत या अपघातात वसीम हरून मुल्ला(४१), अनसुरा बेगम हरून मुल्ला(४१), रेश्मा हलदार (३५), हसीना बेगम हरून पठाण (५४), सामीया मोमीन हलदार(१४) अशी मृतांची नावे आहेत. मासूमा हलदार मोमीन हलदार(१३)ही या अपघातातून बचावली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top