एका शुन्यामुळे रखडले शेतकर्‍यांचे दुधाचे अनुदान

कडेगाव- शेतकर्‍यांच्या गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळविण्यासाठी अर्ज भरताना एक्सेल शिटमध्ये बॅंक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

अनुदानासाठी दूध उत्पादकांची आणि उत्पादनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागते.त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, जनावराचा टॅगिंग क्रमांक आदी माहिती एक्सेल शीटमध्ये भरून शासनाकडे पाठवावी लागते. डेअरी चालकांनी ही माहिती शासनाकडे तपासणीसाठी पाठवली, मात्र त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या माहितीत त्रुटी निघाल्या आहेत.ज्या दूध उत्पादकाचा बॅंक खाते क्रमांक शुन्याने सुरु होतो,त्यांचे प्रस्ताव लटकले आहेत.एक्सेल शीटमध्ये सुरुवातीला शून्य नोंदवता आले नाही. जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या माहितीमध्ये शून्य लिहायचे राहून गेले आहे. त्यामुळे हजारो उत्पादकांची अनुदानाची माहिती एका शून्यामुळे अडकून पडली आहे.एक्सेलमध्ये माहिती भरताना संगणक सुरुवातीला शून्य घेत नसल्याचे अनुभव आहेत. पण बँकांचे खाते क्रमांक शुन्याने सुरु होत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शून्य नसल्याने खाते क्रमांक सदोष दिसून येते, परिणामी अनेकांच्या अनुदानाच्या रकमा खात्यांवर जमा झालेल्या नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top