एनएसईच्या सीईओचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल

मुंबई- नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ आशिषकुमार चौहान यांचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला असून एनएसईने गुंतवणुकदारांना गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
चौहान यांच्या चेहरा व आवाजाचा वापर चुकीच्या पद्धतीने गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या व्हिडियोत वापरण्यात आला असून या व्हिडियोत काही विशिष्ट शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला ते देत असल्याचे दिसत आहे.
हे व्हिडिओ बनावट असून त्यांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. विशेषत: अशा फेक व्हिडिओ किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही गुंतवणूक किंवा इतर सल्ल्याचे पालन करू नये असे एनएसईने या संदर्भात पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top