एनएसई आपली आयटी कंपनी १ हजार कोटींना विकणार

नवी दिल्ली – राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरविणारी आपली एनएसईआय ही कंपनी बहारिनच्या इन्व्हेस्टकॉर्प या कंपनीला १ हजार कोटी रुपयांना विकणार आहे.
एनएसईआयटी ही कंपनी जगभरातील भांडवली बाजार, विमा क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांना अद्ययावत डिजिटल सेवा पुरविते. एनएसईआयटी आणि इन्व्हेस्टकॉर्प यांच्यात नुकताच याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी यासंबंधी माहिती दिली.
इन्व्हेस्टकॉर्प या कंपनीची भारतात तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याची योजना आहे. या योजनेच्या अनुषंगाने कंपनीने एनएसईआयटी कंपनी विकत घेतली आहे.
एनएसईआयटीने अमेरिकेत मागील चार वर्षांच्या कालावधीत तब्बल पन्नास टक्के विकासदर राखला आहे.वित्तीय सेवा क्षेत्रात कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात कंपनीची प्रगती अशीच वेगाने होईल,असे एनएसईआय आणि इन्व्हेस्टकॉर्प या कंपन्यांनी प्रसिध्द केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top