एनडीएच्या दीक्षांत संचलनात प्रथमच महिलांची बटालियन

पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए) दीक्षांत संचलनात (मार्चिंग) प्रथमच महिलांच्या बटालियनने संचलन केले. ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलांनी बटालियनने संचलन केल्यामुळे नवा इतिहास घडला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी स्वत: ही एक ऐतिहासिक घटना असल्याचे नमूद केले. एनडीएचा १४५ वा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला.

दीक्षांत संचलन सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैस, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एनडीएचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अजय कोचर आदी उपस्थित होते. संचलनाला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, ‘आजच्या काळातही महिलांना त्यांचे आवडते करिअर निवडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. असे असताना देखील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये दीक्षांत संचलनात महिलांचा सहभाग असणे हे अतिशय कौतुकास्पद आहे.’ एनडीए मधून एकूण ३५३ विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. संचलनानंतर ‘अंतिम पग’ पादाक्रांत केला गेला. संचलनात १२ विद्यार्थी हे मित्र देशांमधील होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top