एमआयडीसीची जलवाहिनी फुटली

डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीत गुरुवारी रात्री एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर आल्याने सुमारे अर्धा ते एक तास शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काटई गावातील दुर्गा माता मंदिरासमोरील एमआयडीसी ची जलवाहिनी अचानक वॉल जवळ फुटली. अति उच्च दाबाने जलवाहिनीतून पाणी बाहेर येऊ लागल्याने जलवाहिनी शेजारील रहिवासी घाबरले. काही रहिवाशांच्या घरात जलवाहिनीचे पाणी घुसले.
शिळफाटा रस्त्यावरील दुतर्फाची वाहतूक ठप्प झाली. जलवाहिनीच्या वरील भागातून उच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्याने पाण्याचा संपर्क येऊन धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती.स्थानिक रहिवाशांनी तातडीने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. जलवाहिनीचा बारवी धरणाकडून येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. शुक्रवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top