Home / News / एम्पिल चक्रीवादळ जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले

एम्पिल चक्रीवादळ जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले

टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या पूर्वेकडील भागात जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यानंतर प्रशासनाने या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत.

वादळाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने सुरक्षेसाठी इवाकी शहरातील सुमारे ३,२३,००० लोकांना आणि कुशिमा प्रांतातील मोबारा शहरातील १८,५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत. टोकियो आणि नागोया दरम्यानच्या सर्व हायस्पीड बुलेट ट्रेन रद्द केल्या आहेत. एएनए कंपनीने काल २८१ देशांतर्गत आणि ५४ आंतरराष्ट्रीय उड्डाणेही रद्द केली. जपान एअरलाइन्सदेखील २८१ देशांतर्गत आणि ३८ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. १ लाखाहून अधिक प्रवाशांना याचा फटका बसला. यासोबतच रेस्टॉरंट, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मनोरंजन पार्कही बंद करण्यात आले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या