Home / News / एरिने ६ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

एरिने ६ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

फ्रेंच गियाना – युरोपच्या महत्वाकांक्षी एरिने ६ या रॉकेटने यशस्वी उड्डाण केले. ही मोहिम गेल्या चार वर्षांपासून रखडली होती. एरिने...

By: E-Paper Navakal

फ्रेंच गियाना – युरोपच्या महत्वाकांक्षी एरिने ६ या रॉकेटने यशस्वी उड्डाण केले. ही मोहिम गेल्या चार वर्षांपासून रखडली होती. एरिने ६ या रॉकेटने काल सकाळी कोराऊ या फ्रेंच गियाना येथील प्रक्षेपण केंद्रावरुन हे उड्डाण केले. या रॉकेटने त्याच्याबरोबर असलेला उपग्रहही आपल्या कक्षेत स्थिर केला आहे.युरोपच्या अंतराळ मोहिमेतील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मत युरोपियन अंतराळ संस्थेचे प्रमुख जोसेफ अशबॅचर यांनी व्यक्त केले. युरोपियन अंतराळ संस्थेने २०१४ मध्ये या रॉकेटची निवड केली होती. हे रॉकेट पृथ्वीपासून ३६ हजार किलोमिटर उंचीपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर या रॉकेटच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे मोठा विलंबही झाला. काल यशस्वी झालेल्या मोहिमेच्या यशस्वीतेबद्दलही संस्थेला विश्वास नव्हता . मात्र ही मोहिम यशस्वी झाल्यामुळे युरोप अंतराळ संस्थेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या