Home / News / एल्गार प्रकरणी अटकेतील राऊतांनाकायद्याच्या परीक्षेसाठी जामीन मंजूर

एल्गार प्रकरणी अटकेतील राऊतांनाकायद्याच्या परीक्षेसाठी जामीन मंजूर

मुंबई – एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले महेश राऊत यांना विशेष तपास पथकाच्या न्यायालयाने त्यांच्या कायद्याच्या परीक्षेसाठी जामीन मंजूर केला....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले महेश राऊत यांना विशेष तपास पथकाच्या न्यायालयाने त्यांच्या कायद्याच्या परीक्षेसाठी जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महेश राऊत यांची परीक्षा २० एप्रिल ते १६ मे या कालावधीत आहे. या काळातील त्यांचा पत्ता त्यांना द्यावा लागणार असून, आपला मोबाईल फोनही चोवीस तास सुरु ठेवावा लागणार आहे. न्यायालयाने मोबाईल फोनद्वारे सतत त्यांचा ठावठिकाण्याचे तपशील ठेवण्याचे आदेशही पोलिसांना दिले आहेत. राऊत यांना आजच्या त्यांच्या एटीकेटीच्या परीक्षेसाठीही परवानगी देण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात त्यांना परीक्षेला जाण्याचे निर्देश देण्यात आले असून, ९ एप्रिल रोजीही बंदोबस्तात तोंडी परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या