एव्हरेस्ट गलिच्छ! गर्दीही सतत वाढत आहे! गिर्यारोहकांच्या परवान्यांची संख्या कमी करा

काठमांडू : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर करण्याचा पराक्रम करणाऱ्या गिर्यारोहण मोहिमेतील एकमेव हयात सदस्य कांचा शेर्पा यांनी एव्हरेस्टच्या परिस्थितीवर परखड मत व्यक्त केले आहे. सध्या एव्हरेस्टवर प्रचंड गर्दी होत असून अस्वच्छताही वाढली आहे. गिर्यारोहकांसाठी पर्वत, शिखरे देव असून त्याचा आदर राखला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
काठमांडू येथील एका मुलाखतीत कांचा म्हणाले की, सध्या शिखरावर नेहमीच गर्दी असते. दरवर्षी गर्दी वाढतच असल्याचे दिसत आहे. २०२३च्या गिर्यारोहण मोसमात ६६७ गिर्यारोहकांनी शिखर सर केले. परंतु त्यामुळे मार्च ते मे महिन्यांदरम्यान त्यांच्यासह हजारो सहायक कर्मचाऱ्यांची बेस कॅम्पवर गर्दी झाली होती.
|गिर्यारोहकांच्या गर्दीमुळे येथे अनेक महिने वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. त्यातून परिसरातील कचरा वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांना दिलेल्या परवान्यांची संख्या कमी करण्याचा विचार अधिकाऱ्यांनी करावा. गिर्यारोहकांनी स्वत:चा कचरा, उपकरणे आणि मोहिमेदरम्यान नेलेले सामान परत आणणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या परिसर गलिच्छ झाला असून येथे येणारे नागरिक अन्न खाल्ल्यानंतर डबे, कागद, आवरणे फेकून देतात. ते कोण उचलणार, असा प्रश्न कांची यांनी उपस्थित केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top