एसटीची बस आसन व्यवस्था १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई- एसटी महामंडळाच्या विविध सवलतधारी प्रवाशांसाठी एसटी बसमधील आसन व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी पासून नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात येणार असून विधिमंडळ सदस्यांना आता साध्याबस मध्ये १, २ ऐवजी ७, ८ आसन राखीव करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, एसटी कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्थाही बदलण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या बसमध्ये विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकारनिहाय सवलती दिलया जातात. यामध्ये साधी, निमआराम, विनावानानुकूलित शयनआसनी, शिवशाही आसनी, मिडी, वातानुकूलित, व्होल्वो, शिवाई, विनावातानुकूलित शयनयान, राखीव आसने उपलब्ध करुन दिली आहेत, तसेच सेवा प्रकारामध्ये विविध आसनक्षमतेच्या बस चालनासाठी उपलब्ध आहेत. सध्या एसटी महामंडळात नव्याने ईटीआयएम-ओआरएस कार्यप्रणाली कार्यान्वित झाली आहे. जुन्या कार्यप्रणालीमध्ये बसचे वेगवेगळे सीट लेआऊट उपलब्ध आहेत. याशिवाय बस प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना विविध बसमध्ये आसन क्रमांक देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी तक्रार करत आहेत. या तक्रारी येऊ नयेत याकरीता व आसन व्यवस्थेमध्ये एकसुत्रता आणण्याकरीता एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top