एसटीच्या ताफ्यात लवकरच वातानुकूलित मिनी गाड्या

मुंबई- घाट चढण्यासाठी उपयुक्त आणि पर्यावरणपूरक अशा २० वातानुकूलित विद्युत बसेस लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ठाणे-१ बस आगारामार्फत या गाड्या ठाणे-नाशिक आणि बोरिवली- नाशिक दरम्यान धावणार असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले.

या वातानुकूलित बसेस एकदा चार्ज केल्यानंतर २०० किलोमीटरपर्यंत धावू शकतील.या गाड्यांमध्ये ३५ आरामदायक आसने असून पुढील दोन-चार दिवसांत या २० गाड्या प्रत्यक्ष प्रवासी सेवेत दाखल होतील.सध्या एसटी महामंडळाने विद्युत बसेस घेण्यास प्राधान्य दिले आहे.९ मीटरच्या २,३०० मिनी बसगाड्या आणि १२ मीटरच्या २,८५० मिनी गाड्या घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.त्यापैकी १०० बसेस दाखल झाल्या असून त्या दादर-पुणे,बोरिवली-पुणे आणि ठाणे-पुणे मार्गावर धावत आहेत.तर आता ९ मीटरच्या २३०० पैकी पहिल्या २० मिनी गाड्या ठाणे-१ आगारात दाखल झाल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top