एसटी कर्मचार्यांना ६,००० रुपयांचा बोनस

मुंबई – एसटी कर्मचा-यांना सरकराने ६ हजार रुपये इतका बोनस जाहीर केला आहे. हा बोनस सरसकट दिला जाणार आहे. सरकारने एसटी कर्मचार्यांची दिवळी गोड करण्याचा प्रयत्न केला असला तरी बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी नाराज झाले आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचा-यांना बोनसच्या रुपात दिवाळी भेट दिली. मात्र, कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही.सरकारने इतर महामंडळांच्या कर्मचार्यांना दिलेल्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे, असे एसटी कर्मचार्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top