Home / News / एसपी कॉलेजच्या मैदानात चिखल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द

एसपी कॉलेजच्या मैदानात चिखल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज ज्या एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होती त्या मैदानावर मुसळधार पावसाने चिखल...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज ज्या एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होती त्या मैदानावर मुसळधार पावसाने चिखल झाला. त्याचबरोबर वेधशाळेने आज पावसाचा रेड अलर्ट जारी केल्याने मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत आज सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला.त्यातच आज वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वर्तविला होता.या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला.

Web Title:
संबंधित बातम्या