ऐन कार्तिकी एकादशीआधी पंढरपुरात झिकाचा शिरकाव

पंढरपूर – काही दिवसांपूर्वी पुण्यात एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात आता ऐन कार्तिकी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईवरून एक महिन्यापूर्वी आलेल्या डॉक्टरला पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर त्रास जाणवू लागला. त्यांना पुणे येथे जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची तब्येत चांगली आहे. पंढरपूरमध्ये सर्वत्र तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकही झिका व्हायरस रुग्ण सापडलेला नाही. दरम्यान, येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. पंढरपूर यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सात ते आठ लाख भाविक येतील. त्यामुळे स्थानिक प्रशासन पंढरपुरात विशेष काळजी घेत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top