Home / News / ऑरेगॉनमध्ये स्वस्तिक व हॅकेनक्रूएझ चिन्हांतील फरक अधिकृतरित्या स्पष्ट

ऑरेगॉनमध्ये स्वस्तिक व हॅकेनक्रूएझ चिन्हांतील फरक अधिकृतरित्या स्पष्ट

ऑरेगॉनमध्ये स्वस्तिक व हॅकेनक्रूएझ चिन्हांतील फरक अधिकृतरित्या स्पष्टन्यूयॉर्क -हिंदूंचे स्वस्तिक आणि जर्मन नाझीचे हॅकेनक्रूएझ या दोन चिन्हात नेहमी गल्लत केली...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

ऑरेगॉनमध्ये स्वस्तिक व हॅकेनक्रूएझ चिन्हांतील फरक अधिकृतरित्या स्पष्टन्यूयॉर्क -हिंदूंचे स्वस्तिक आणि जर्मन नाझीचे हॅकेनक्रूएझ या दोन चिन्हात नेहमी गल्लत केली जाते. परंतु अमेरिकेमधील ओरेगॉन राज्याच्या शिक्षण विभागाने आता हिंदूंचे पवित्र चिन्‍ह स्‍वास्‍तिक आणि नाझीचे हॅकेनक्रूझ या चिन्हातील फरक अधिकृतपणे स्‍पष्‍ट केला आहे. त्यामुळे आता ही चिन्हे वेगवेगळी आहेत, हे बिंबवणे सोपे होणार नाही.

या निर्णयानंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने एक्सवर एक पोस्ट करून आमच्या समुदायासाठी हा ऐतिहासिक विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हुक केलेल्या क्रॉसला सामान्यपणे ‘स्वस्तिक’ म्हटले जाते, परंतु ती खूण स्वस्तिक नसून नाझी आणि ते निओ-नाझीचे ‘हकेनक्रूझ’ हे चिन्ह असते. त्यामुळे आता ते स्वस्तिक म्हणून ओळखले जाणार नाही, असे ओरेगॉन राज्याच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. संस्कृत हा संस्कृत शब्द आहे. स्वस्तिक प्रतीक हे हिंदू , बौद्ध , यहुदी , जैन धर्म आणि काही मूळ अमेरिकन धर्म आणि संस्कृतींसह समृद्धीचे आणि नैसर्गिक जगाच्या घटकांचे प्रतीक म्हणून वापरले जाते, असेही ओरेगॉन राज्यातील शिक्षण विभागाने म्हटले आहे.

हा महत्त्वपूर्ण निर्णय भावी पिढ्यांसाठी आपल्या प्रतिकांचे पावित्र्य जपण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ओरेगॉमधील समर्थकांच्‍या अखंड पाठिंब्याशिवाय आणि समर्पणाशिवाय हा विजय शक्य झाला नसता. आपण आपल्या पवित्र स्वस्तिकाच्या खऱ्या अर्थाविषयी जागरूकता पसरवू या, असे असे हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या