ऑस्ट्रेलिया कार अपघातात भारतीय तरुणाचा मृत्यू

मेलबर्न :

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात एका २६ वर्षीय भारतीय तरुणाचा कार अपघातात जागीच मृत्यू झाला. खुशदीप सिंह असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री ११.१५ वाजता पामर्स रोड गाडी चालवत असताना अचानक खुशदीपचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

खुशदीप सिंह पत्नी जपनीत कौरसह ऑस्ट्रेलियात राहत होता. सोमवारी रात्री ११:१५ वाजता खुशदीप काही कामानिमित्त बाहेर गेला असता त्याच्या गाडीचा पामर्स रोडवर अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच आयोग्य सेवा घटनास्थळी दाखल झाली. मात्र त्यापूर्वीच खुशदीपचा मृत्यू झाला होता. स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. खुशदीप यांच्या मृत्यूनंतर सिंह कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारतात परतण्यासाठी त्याच्या पत्नीने ‘गो फंड मी’ या सोशल मीडियावरील पेजवर आर्थिक देगणीची मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top