ओक्लाहोमा शहरात ५.१ तीव्रतेचा भूकंप

वॉशिंग्टन :

अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरात ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचेधक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र ओक्लाहोमा शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. काल रात्री ११ .२४ वाजता ही घटना घडली.

जानेवारी महिन्यात ओक्लाहोमा शहराच्या एकाच दिवशी ६ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ४.० पेक्षा जास्त होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ओक्लाहोमा शहराच्या ईशान्येस सुमारे ६४ किलोमीटर भूकंप झाला होता. त्याचीदेखील ४.० इतकी तीव्रता होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top