ओडिशाच्या जगन्नाथ मंदिरात १ जानेवारीपासून वस्त्रसंहिता

भुवनेश्वर

ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी १ जानेवारीपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. वस्त्रसंहिता लागू झाल्यानंतर भाविकांना हाफ पँट, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, मंदिरात कोणते कपडे घालण्यास परवानगी द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

काल मंदिराच्या धोरण उपसमितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी सांगितले की, काही लोक समुद्रकिनारी किंवा उद्यानात फिरायला आल्यासारखे हाफ पँट आणि स्लीव्हलेस कपडे घालून येतात. त्यामुळे इतर भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. देव मंदिरात राहतो. हे मनोरंजनाचे ठिकाण नाही.’ तसेच मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणाले की, मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२४ पासून वस्त्रसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल. मंदिराच्या सिंहद्वारावर तैनात सुरक्षा दल आणि मंदिरातील प्रतिहारी सेवक त्यावर लक्ष ठेवतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top