ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांकडे ७१ कोटी रुपयांची संपत्ती

भुवनेश्वर – ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गेल्या ५ वर्षांत त्यांच्याकडे असलेल्या मालमत्ता ७ कोटींवरून ७१.०१ कोटींवर गेली आहे. २०१९ मध्ये पटनायकांकडे ६३. ८७ कोटी रुपयांची संपत्ती होती. पटनायक यांनी २ दिवसांपूर्वी हिंजली विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामध्ये त्यांनी १४. ०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त जंगम मालमत्ता आणि ५७.०१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता नमूद केली आहे. त्यांच्याकडे १९८० मॉडेलची ॲम्बेसेडर कार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी कागदपत्रात नमूद केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top