ओडिशात भाजपा स्बळावर लढणार

भुवनेश्वर- भाजपा ओडिशात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या बिजु जनता दला बरोबर युती संदर्भात झालेल्या चर्चा फिस्कटल्यानंतर भाजपाने हा निर्णय घोषित केला आहे. ओडिशात लोकसभा निवडणूकीबरोबरचं विधानसभेच्याही निवडणूका होत आहेत.
भाजपाचे ओडिशा प्रदेशाध्यक्ष मनमोहन समल यांनी आज एक्स या समाजमाध्यमावर ही माहिती दिली. भाजपा ओडिशातील लोकसभेच्या २१ जागांवर व विधानसभेच्या १४७ जागांवर लढेल आणि जिंकेल असे त्यांनी समाजमाध्यमावर म्हटले आहे. भाजपा आणि बिजू जनता दल यांच्यामध्ये १९९८ ते २००९ या काळात युती होती. या काळात दोन्ही पक्षांनी मिळून ३ लोकसभा आणि २ विधानसभा निवडणूका एकत्र लढवल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षात युती होण्यासंदर्भात अनेक बैठकाही झाल्या होत्या. अखेर युती होण्याच्या शक्यतेवर पडदा पडला असून भाजपाने स्वबळावर निवडणूका लढण्याचे घोषित केले आहे. युती होणार नाही हे निश्चित झाल्यानंतर ओडिशाच्या जनतेला केंद्र सरकारी योजनांचे लाभ मिळत नाहीत असा आरोपही भाजपाने केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top