ओडिशामध्ये भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू! ७ गंभीर जखमी

भुवनेश्वर : ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यात व्हॅनने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघातात घडला. यात ८ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले. सर्व मृत गंजम येथील दिगापहांडी येथील रहिवासी होते.

काल रात्री पोदामारी गावातील २० जण व्हॅनमधून क्योंझर जिल्ह्यातील तारिणी देवीच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी आज पहाटे पाचच्या सुमारास व्हॅनने महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बळीजोडी पोलिसांनी जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला. याप्रकरणी क्योंझरचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, “२० जणांनी भरलेली व्हॅन भरधाव वेगात ट्रकला धडकली. धुके असल्याने व्हॅन चालकाला समोरील वाहनाचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top