ओपन एआयचे सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये जाणार

वॉशिंग्टन :

चॅट जीटपी बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीने २ दिवसांपूर्वी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले होते. कंपनीच्या या निर्णयाला विरोध करत, ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी हे दोघेही मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होत असल्याची माहिती त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी केलेल्या एक्समध्ये म्हटले आहे की, सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन मायक्रोसॉफ्टमध्ये नवीन प्रगत एआय संशोधन कार्याचे नेतृत्व करणार आहेत.हे दोघेही मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार असल्याची बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत. आम्ही ओपन एआय सोबतच्या आमच्या भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top