‘ओला’त कर्मचारी कपातीची शक्यता सीईओ हेमंत बक्शीचा राजीनामा

मुंबई

ओला कॅब ही कंपनी लवकरच १० टक्के कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. ही नोकरकपात होण्याआधीच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हेमंत बक्शी यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते जानेवारी २०२४ मध्ये कंपनीत रुजू झाले होते. मात्र, ३ महिन्यातच त्यांनी कंपनीचा कार्यभार सोडला आहे.

हेमंत बक्शी हे दुसऱ्या कंपनीत काम करू इच्छित असल्याने त्यांनी ओला कंपनीला आपला राजीनामा देत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता ओला कॅबच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान. ओलामध्ये मागील काही दिवसांपासून घडामोडी होत आहेत. कंपनीच्या आयपीओविषयी गुंतवणूकदारांमध्ये चर्चा सुरू होती. कार्तिक गुप्ता आणि सिद्धार्थ शकधर हे कंपनीचे नवे मुख्य व्यवसाय अधिकारी (सीबीओ) बनले आहेत. ओलाने त्यांची आंतराष्ट्रीय सेवादेखील बंद केली आहे. यात ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. कंपनीने आपले लक्ष्य भारतावर केंद्रीत केल्याचे सांगितले जाते. कंपनीचे १०० कोटींहून अधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top