कंधार रस्त्यावर दुचाकींच्या अपघातात १ ठार, १ जखमी

नाशिक

नाशिकच्या बाळंतवाडी गावाजवळील कंधार घोडज रस्त्यावर आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची धडक दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. बालाजी नारायण जाधव (वय ४५) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गुलाब लक्ष्मण गित्ते (वय २७) असे जखमीचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालाजी जाधव लोहा तालुक्यातील चोंडी गावाहून घोडज मार्गे कंधारकडे येत असताना गुलाब गीते कंधार येथून नागदरवाडीकडे येत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top