कचऱ्याच्या ढिगासमोरच जोडप्याचे प्री-वेडींग शूट

तैपेई

तैवानमधील नान्टो काऊंट शहरातील आयरिस सुएह आणि इयान सिलोऊ या जोडप्याने कचऱ्याच्या ढिगासमोरच लग्नासोहळ्यापूर्वी प्री-वेडींग शूट केले. या दोघांच्या लग्नसोहळ्याला येणार्‍या पाहुण्यांनी अनावश्यक कचरा करू नये आणि स्वच्छतेबाबत सतर्कता बाळगावी, अशी अपेक्षा या वेळी जोडप्याने व्यक्त केली. लग्नसोहळ्याला येताना पाहुण्यांनी स्वतःबरोबर एक डबा घेऊन यावा. जेणेकरून शिल्लक राहिलेले जेवण ते डब्यात भरतील. या सगळ्यामुळे अन्न वाया जाणार नाही याची पाहुणे काळजी घेतील, असे मत जोडप्याने प्री वेडिंग शूट दरम्यान व्यक्त केले आहे. लग्नासोहळ्यापूर्वी प्री-वेडिंग शूट करण्यासाठी अनेक जोडपे निसर्गरम्य आणि मनमोहक ठिकाणांची निवड करतात. पण तैवानमध्ये एका जोडप्याने चक्क कचर्‍याच्या ढिगासमोर प्री-वेडिंग शूट केला आहे. या शूट दरम्यान जोडप्याने पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा संदेशच दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top