कणकवलीच्या नांदगावात आज कोळंबाचा जत्रोत्सव

कणकवली- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्रीदेव कोळंबाची जत्रा उद्या रविवारी ५ मे रोजी होणार आहे. मटण भाकरीच्या प्रसादासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यात प्रसिद्ध असणारा व भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा म्हणून श्रीदेव कोळंबाची ख्याती आहे.

उद्या जत्रोत्सवानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी सकाळी ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ महाप्रसाद म्हणून मटण व भाकरीचा प्रसाद वाटप केले जाणार आहे.
महाराष्ट्रात मटण भाकरीचा प्रसाद अशी ओळख असणा-या या जत्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या प्रसादासाठी ग्रामस्थांनी ७०० ते ८०० किलो भाकरीच्या पिठाची व्यवस्था करून ठेवली आहे. आजूबाजूच्या गावातही या प्रसादाचे वाटप केले जाते. भाविकांनी या जत्रोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीदेव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top