Home / News / कणकवलीच्या नाटळमध्ये सह्याद्रीचा कडा कोसळला

कणकवलीच्या नाटळमध्ये सह्याद्रीचा कडा कोसळला

कणकवली – काही दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या सह्याद्री पूर्वेकडील कड्याचा काही भाग ढासळला आहे. जवळपास ३०० मीटरचा हा ढासळलेला...

By: E-Paper Navakal

कणकवली – काही दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या सह्याद्री पूर्वेकडील कड्याचा काही भाग ढासळला आहे. जवळपास ३०० मीटरचा हा ढासळलेला भाग साधारण ३०० मीटर लांबीचा आहे.

दोन वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे डोंगर कोसळून एक घर जमीनदोस्त झाले होते. तसेच या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नाटळसह सह्याद्री पट्टयातील गावांमध्ये चिंता व्यक्त होत होती.त्यानंतर आता या सह्याद्रीच्या कड्यातील सुमारे ३०० मीटरचा बुरूज काही दिवसापूर्वी ढासळला आहे. तो निर्जनस्थळी कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.नाटळसह परिसरातील गावांच्या सह्याद्री पट्टयात डोंगराच्या पायथ्याशी मोठी लोकवस्ती आहे.त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.दरवर्षी जिल्ह्यात अशा घटना घडतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सर्व गावांनी याची दखल घेऊन सरकार आणि पर्यावरण खात्याचे लक्ष वेधण्याची गरज आहे.

Web Title:
संबंधित बातम्या