कमलापूरचा हत्ती कॅम्प १२ दिवस बंद राहणार

गडचिरोली : जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील हत्तींना १२ दिवसांची वैद्यकीय रजा देण्यात आली आहे. यामुळे पुढील १२ दिवस कमलापूर हत्ती कॅम्प बंद राहणार आहे.

गडचिरोली जिल्हातील सिरोंचा वन विभाग अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्र आहे. येथे अजित, मंगला, बसंती, रुपा, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी असे आठ हत्ती आहेत. वाढत्या थंडीमुळे या हत्तींच्या तळपायाला भेगा पडत आहेत. त्यांना चालताना त्रास जाणवल्याचे वन विभागाच्या अधिका-यांच्या लक्षात आले. या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी आठही हत्तींना १२ दिवसांची वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. सुमारे १० दिवसांत हत्तींच्या पायांना शेक दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव हत्ती बघण्यासाठी कमलापूर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top