करवा चौथला हिंदूंकडूनच हातावर मेंदी लावून घ्या! विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

भोपाळ- विश्व हिंदू परिषदेने उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात उद्या असलेल्या करवा चौथ या सणाबाबत एक आदेश जारी केला. या पवित्र सणासाठी फक्त हिंदू भगिनींकडूनच हातावर मेंदी लावून घ्यावी, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि राष्ट्र सेविका समितीने पत्रके वाटून याचा प्रचारही केला आहे. ‘आपला सण, आपल्या लोकांना रोजगार, जिहादींवर प्रहार,’ असे या पत्रकात लिहिले आहे.

यासंदर्भात २५ ऑक्टोबर रोजी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत गोरक्षण प्रमुख ललित माहेश्वरी यांच्या घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत करवा चौथबाबत निर्णय घेण्यात आला. करवा चौथच्या सणाला अल्पसंख्याक समाजातील तरुण-तरुणी उपवास करणाऱ्या हिंदू महिलांच्या हातावर मेंदी लावतात. हिंदू महिलांच्या हातावर मेंदी लावण्याच्या बहाण्याने हे लोक लव्ह जिहादचा प्रचार करतात, असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे काल आणि आज शहरात ११ ठिकाणी मेंदी केंद्रेही उभारण्यात आली. या केंद्रात करवा चौथचे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या हातावर हिंदू मुलींनी मेंदीही काढण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top