Home / News / कराडच्या खोडजाईवाडीचा एमआय तलाव १०० टक्के भरला

कराडच्या खोडजाईवाडीचा एमआय तलाव १०० टक्के भरला

कराड- यंदा तालुक्यातील मसूर गावच्या पूर्वेला असलेल्या खोडजाईवाडी (किवळ) गावातील एमआय तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

सुमारे ६५ एकर जागेत पसरलेल्या या खोडजाईवाडी तलावात २०१४ पासून पाणीसाठा सुरू झाला आहे. गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने हा एमआय टँक कोरडा पडला होता.त्यामुळे या गावाला दुष्काळाचा सामना करावा लागला होता.मात्र यंदा पावसाने चांगली कृपादृष्टी केल्याने हा तलाव तुडुंब भरला आहे.त्यामुळे आता पुढील पावसाळ्यापर्यंत खोडजाईवाडी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.